नेघे भूमंडळ न घाली त
1773.
नेघे भूमंडळ न घाली तुज सांकडे | तुजवीण केवढी जोडी याची ॥१॥
चरण मी सेवीन गाईन मी नाम | हृदयी धरोन प्रेम नाचेन सदा ॥२॥
ऋद्धिसिद्धि नेषे कामना न लगती | तुजवीण श्रीपती अवघे वेर्थ ॥३॥
रसातळ भूतळ वैकुंठासी नये | तुजवीण न पाहे ठाव कोठे ॥४॥
विष्णुदास आम्ही भक्तिविण नेघो | दारींच वोळगो तुझ्या देवा ॥५॥
नामा म्हणे हेचि चाड गा विठ्ठला | हा पुंडलिके सांगितला गुह्य ठेवा ॥६॥
