विपयाचे आळुके जरी नव
1771.
विपयाचे आळुके जरी नव्हतो दीन | तरी दीनानाथा कोण म्हणती तुज ॥१॥
सुष्ट दुष्ट तरी आमुचे आचरण | ते तुज भूषण जाले देवा ॥२॥
पतितपावन ब्रीद कैसेनी जोडते ॥ जरि आम्ही नव्हतो कर्मज ॥३॥
नामा म्हणे ऐसे आहे जी गा देवा | विचारो केशवा मायबापा ॥४॥
