स्फुंदस्फुंदोन नामा
1797.
स्फुंदस्फुंदोन नामा उभा महाद्रारी । चित्त पायांवरी विठोबाच्या ॥१॥
उभा दीनानाथ उभारुनी बाहे । पालवीत आहे पीतांबरे ॥२॥
आरता येरे नामया धरिला पोटासी । कोणे गांजिलासी दुर्जनाने ॥३॥
अंतरींचे सांग पडे माझ्या मार्गे। का करिशी उद्देग संसारीचे॥४॥
नामा म्हणे विठो अर्से मी नेणता । आठवी पंढरिनाथा वेळोवेळा ॥५॥
