प्रकाश तरणी न बोले व
1797.
प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥
वेदासी अगोचर ध्यानासी कानडे । ते ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणी ॥२॥
काळासी नाकळें कर्मीं जे न मिळे । सर्वांसी न कळे असुनियां ॥३॥
जीवी जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदनंद ॥४॥
सदगुरु बोधें ब्रह्मा ब्रह्मार्पण । जीवासी सोडवण सदगुरुचरणी ॥५॥
गुरुजप सदा नाम एक वस्ती । एका जनार्दनी प्राप्त सहज नाम ॥६॥
