वैष्णवा भुषण मुद्रां
1782.
वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठी ॥१॥
तयांचियां पायी माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखी ॥२॥
आसनी शयनी भोजनी नित्यता । स्मरणी जे तत्त्वता रामनाम ॥३॥
पुण्यपावन देह जन्माचें सार्थक । एका जनार्दनी कौतुक त्याचे मज ॥४॥
