निर्विकल्प नाम अनंत
1779.
निर्विकल्प नाम अनंत कल्पना | होसी नारायणा अव्यक्तेंसी ॥१॥
लाज ते लाविली निर्गुणपणासी | श्रुति पुराणासी साम्य दावी ॥२॥
चातुर्य सागर नंदाचा खिल्लारी गायी निरंतरी चारशील ॥३॥
तू देवपण मिरविसी निके | नामा म्हणे सुख तुझे पायी ॥४॥
