वतन आमुचे मिरास पंढर
1781.
वतन आमुचे मिरास पंढरी | विठोबाचे घरी नांदणूक ॥१॥
सेवा करू नित्य नाचू महाद्वारी | नामाची उजरी जागवू तेथे ॥२॥
साधुसंता शरण जावू मनोभावे | प्रसाद स्वभावे देती मज ॥३॥
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे | संत पाय हिरे देती बरू ॥४॥
