राजमंदिराभीतरी रुक्म
1766.
राजमंदिराभीतरी रुक्मिणी सेजेवरी | नामा परसांसरी वोळगो आले ॥१॥
नामया देखोनी झडकरी उठली | आड उभी ठेली जाऊनिया ॥२॥
अचळ सरिसा करी श्रृंग माथ्यावरी | पाहे पा निदसुरी होती कैसी ॥३॥
मी म्हणे नावेक लागेल वेळ याते | तंव अवचिते देखियेले ॥४॥
कनक परयेळी घेउनी आरती करी| ओवाळिले हरी नामयासहित ५ ॥
