वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

दिनेदिने शंका वाटे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080241 · अभंग क्र. १७८६

1786.
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवता गाढे ॥१॥
कैसी भुलली बापुडी । दंबविषयांचे सांकडी ॥धृपद॥
विसरली मरण । त्याची नाही आठवण ॥२॥
देखत देखत पाही । तुका म्हणे आठव नाही ॥३॥

अर्थ :
संसारातील लोकांचे आयुष्य बघता, त्यांचा दिनक्रम बघता दिवसेंदिवस माझी या लोकांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल शंका वाढत चालली आहे. ही बापुडी प्रापंचिक माणसे या दंभगिरीला किती खोलवर भुलतात याचे मला वाईट वाटते, आयुष्य किती गूढ आहे, मायेने किती भरलेले आहे व त्यातून स्वतःहून बाहेर येणे किती कठीण आहे किंबहुना स्वबळावर बाहेर येणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे हे माहित नसल्याने ही बिचारी माणसे येथील दांभिक आयुष्याला भुलत चालली आहेत आणि विषयाच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहेत. अशा या लोकांना मरणाचे स्मरण देखील राहिले नाही उलट माणसाला मरण असते हेच ते विसरली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत, ह्या ना त्या कारणाने त्यांचा अंत होत आहे व कमावलेले सर्व तसेच टाकून त्यांना जावे लागत आहे हे सर्व ही माणसे रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत परंतु तरीही आयुष्याच्या खऱ्या सत्याचे त्यांना स्मरण नाही किंवा अजूनही कसे होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग