वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

माय मेली पोरटे लहान

🙏 4. संत नामदेव · ABH-082621 · अभंग क्र. १७८७

1787.
माय मेली पोरटे लहान | कवाड धरून उभे ठेले ॥१॥
नेणते बापुडे दारवंटा धरी | शेखी आस करी भितरील ॥२॥
राउळी म्हणती कैचे हे भणंग | जंव तंव अंग चुकावीत ॥३॥
जाति नाही त्यासि कायसी पंगती | म्हणोनी एकांती बैसविले ॥४॥
सातादारवंठा बाहेर टाकी पूजा | तेथे बन्या वोजा बैसविले ॥५॥
देव म्हणे नाम्या पोशीन मी तूते | नामामृतशिते देऊनिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग