इतुक्या माजी चोखा घर
5.
इतुक्या माजी चोखा घरासी तो आला । वृत्तांत निवेदिला सोयराई ॥१॥
येरू म्हणे हे काय अनुचित केले । बोल ते लाविले आपणासी ॥२॥
जातिचे तो महार जग जाणताती । आपुली फजिती आपुल्या हाते ॥३॥
कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण । आपुले कारण साधी आधी ॥४॥
बंका म्हणे ऐसे बोल ते ऐकोनी । सोयरा चरणी घाली मिठी ॥५॥
