म्हैसी पुत्रामुखे बो
5.
म्हैसी पुत्रामुखे बोलावणे श्रुती । चालवणे भिंती बैसोनिया ॥१॥
नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातीचा मूर्ति जेवी ॥२॥
उदकामाजी वह्या ठेऊनि कोरड्या । दाखवणे रोकड्या विश्वजना ॥३॥
निळा म्हणे तिही संगेचि तारणे । दीने उद्धरणे नवल कोण ॥४॥
