अनामधारकाचानिषेध पर
६.
अनामधारकाचानिषेध पर
२५.
मुखी नाम नाही । त्याची संगती नको पाही ॥१॥
ऐसियाचे मुखी माउली । वार घालिता विसरली ॥२॥
जया नावडे संतसंगती । अधम जाणावा निश्चिती ॥३॥
नाम घेतां लाज वाटे । रंभे निर्लज्ज भेटें ॥४॥
जाता हरिकीर्तना । नावडे ज्याच्या मना ॥५॥
सेना म्हणे त्यास । कुलासुद्धां नर्कवास ॥६॥
२६.
स्वहित सांगावे भले । जैसे आपणासि कळे ॥१॥
त्यांच्या पुण्या नाही पार । होय अगणित उपकार ॥२॥
मोहपाशें बांधिला । होता तोहि मुक्त केला ॥३॥
जेणे वाट दाखविली । सेना म्हणे कृपा केली ॥४॥
२७.
रामकृष्ण नामे । ऐसी उच्चारावीं प्रेमे ॥१॥
तेणें काळ दुरी पळे । जाती दोष ते सकळे ॥२॥
ऐसा नामाचा प्रताप । मागें निवारिला ताप ॥३॥
मुखी रामनाम उच्चारी । सेना म्हणे निरंतरी ॥४॥
