वसुदेवा देत देवकी बह
6.
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न झाले ऐका ॥१॥
आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरवंसा हा बोलण्याचा ॥२॥
आठवा इचा पुत्र वधील तुजसी । ऐकोनी मानसी क्रोधावला ॥३॥
घेऊनिया खडग माराया धांवला । हात तो धरीला वासुदेवे ॥४॥
देईन मी पुत्र सत्य माझे मानी । ठेवा बंदीखानी दूता सांगे ॥५॥
पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवू नको ॥६॥
होतांची प्रसूत नेऊनिया देत । सहाही मारीत दुराचारी ॥७॥
धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक । वधिता बाळक नामा म्हणे ॥८॥
