वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 4. संत एकनाथ निवडक अभंग

अजानवृक्षांची पाने ज

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072464 · अभंग क्र. ६

6.
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान । जेथे संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्र्वरी तीन सप्तके । जो श्रवण करील विवेके ।
तो होय ज्ञानी अधिके । येथे संशय नाही ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती ।
ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाही ॥३॥
अश्वत्थ सिद्धेश्वर । समाधीसी करी नमस्कार ।
तो पावे मोक्ष पै सार । येथे संशय नाही ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण ।
म्हणे एका जनार्दन । येथे संशय नाही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग