वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 36. संस्कृत ग्रंथ › 1. सार्थ पंचदशी (विद्यारण्यतीर्थ) › २. पंचदशी परिच्छेद एकूण १५ › 5 पञ्चमः परिच्छेदः - महावाक्यविवेकः

पञ्चमः परिच्छेदः - म

🙏 36. संस्कृत ग्रंथ · ABH-081123 · अभंग क्र. ५

5 पञ्चमः परिच्छेदः - महावाक्यविवेकः

येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च ।
स्वाद्वस्वादू विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥१॥

अर्थ :
गुरु - आता तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरून सांगतो. त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदांतील ''प्रज्ञानं ब्रह्म'' या महावाक्यांतील '''प्रज्ञान'' शब्दाचा अर्थ सांगतो. ज्या चैतन्याच्या योगेंकरून हा जीव पहातो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हे गोड आणि हे कडू असे रसनाद्वारें जाणतो, त्यास ''प्रज्ञान'' असे म्हटले आहे. शिष्य - "प्रज्ञान'' या शब्दाचा अर्थ समजला. आता ब्रह्म म्हणजे काय ते कृपा करून सांगा. ॥१॥

चतुर्मुखेन्द्रदेवेषु मनुष्याश्वश्वगवादिषु ।
चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि ॥२॥

अर्थ :
गुरु - ब्रह्मादिदेवांचेठायीं मनुष्याचेठायी गवाश्वादि पशूंचेठायी आणि आकाशादि पंचभूतांचेठायी जन्मस्थितिलयांस हेतुभूत सर्वत्र व्यापून असणारे जे चैतन्य, तेंच ब्रह्म - येणेंकरून ''एष ब्रह्मा'' ''एष इंद्र:'' इत्यादि अवांतर वाक्यांचाही अर्थ सांगितल्यासाररवा झाला. असे जे सर्वत्र व्यापून असणारे जे प्रज्ञान ते जर ब्रह्म आहे, तर माझ्याठायीं व्यापून असणारे जे प्रज्ञान तेही असलेंच पाहिजे. हेंच या वाक्याचे तात्पर्य. शिष्य - हे ऋग्वेदातील महावाक्य झाले. आता यजुर्वेदापैकीं बृहदारण्यकोपनिषदांतील ''अहं ब्रह्मास्मि'' या महावाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा. ॥२॥

परिपूर्णः परात्मास्मिन्देहे विद्याअधिकारिणि ।
बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितीर्यते ॥३॥

अर्थ :
गुरु - बरे आहे. प्रथम ''अहं'' शब्दाचा अर्थ सांगतो. देशकालवस्तुपरिच्छेदरहित परिपूर्ण असा परमात्मा, तत्त्वज्ञानास अधिकारी अशा देहाचेठायी बुद्धीचा साक्षी होऊन जो प्रकाशत आहे, त्यालाच येथे "अहम्'' असे म्हटलें. ॥३॥

स्वतः पूर्णः परात्मात्र ब्रह्मशब्देन वर्णितः ।
अस्मीत्यैक्यपरामर्शस्तेन ब्रह्म भवाम्यहम् ॥४॥

अर्थ :
आता ब्रह्म शब्दाचा अर्थ ऐक. स्वभावत: जो देशकालवस्तु परिच्छेदरेहित सर्वत्र व्यापून असणारा परमात्मा तोच येथे ब्रह्म असे समजा. ''अस्मि'' या क्रियापदाने, ''अहम्" आणि ''ब्रह्म'' या दोन पदाचे सामानाधिकरण्य करून, जीवब्रह्माचें ऐक्य दर्शविले. म्हणून मीच ब्रह्म आहें, असे या महावाक्याचें तात्पर्य आहे. शिष्य - ''प्रज्ञानं ब्रह्म '' आणि ''अहं ब्रह्मास्मि '' या दोन महावाक्यांचा अर्थ समजला. आता सामवेदापैकी छान्दोग्य श्रुतीतील ''तत्त्वमसि '' या वाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा. ॥४॥

एकमेवाद्वितीयं सन्नामरूपविवर्जितम् ।
सृष्टेः पुराधुनाप्यस्य तादृक्त्वं तदितीर्यते ॥५॥

अर्थ :
''सदेवसौम्येदमग्रआसीदेकमेवाद्वितीयम्'' या श्रुतीने सृष्टीच्या पूर्वी जी स्वगतादि भेदशन्य नामरूपरहित सद्‌वस्तु होती, ती आताही तशीच आहे, असे दाखविण्यासाठी येथे तत्पदाचा उपयोग केला म्हणून तत्पदाचा अर्थ तीच सद्वस्तु असे समजावें. ॥५॥

श्रोतुर्देहेन्द्रियातीतं वस्त्वत्र त्वं पदेरितम् ।
एकता गृह्यतेऽसीति तदैक्यमनुभूयताम् ॥६॥

अर्थ :
आणि उपदेश श्रवण करणारा जो शिष्य त्याच्या देहेंद्रियांचा जो साक्षी म्हणजे तिन्ही शरीरास जो पहाणारा तोच येथे त्वंपदानें दाखविला. आणि, ''असि'' म्हणून जे क्रियापद या वाक्यांत आहे त्याने "तत्'' आणि ''त्वम्'' या दोन्ही पदांचे ऐक्य सांगितले, त्याचा अनुभव मुमुक्षूंनी घ्यावा. शिष्य - आता चौथे जे महावाक्य "अयमात्मा ब्रह्म'' त्याचा अर्थ सांगावा ॥६॥

स्वप्रकाशापरोक्षत्वमयमित्युक्तितो मतम् ।
अहङ्कारादिदेहान्तात्प्रत्यगात्मेति गीयते ॥७॥

अर्थ :
गुरु - "अयम्'' या शब्दाचा अर्थ असा की, आत्मा हा अवेद्य असून स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे. तो अदृश्य पदार्थासारखा परोक्षही नाही, व घटादि पदार्थासारखा दृश्यही नाही, असे दाखविण्यासाठी येथे ''अयम्'' या पदाची योजना केली. शिष्य - अहो, पण आत्मा हा शब्द देहालाही केव्हा केव्हा लावतात. मग या महावाक्यांतील ''आत्मा'' या शब्दाचा विवक्षित अर्थ कोणता ? गुरु - अहंकारापासून देहापर्यंत जितकी म्हणून जड तत्त्वें आहेत त्या सर्वांचा तो साक्षी तोच येथे आत्मा असे समजावे. शिष्य - ब्रह्म शब्दाचाही विवक्षित अर्थ समजला पाहिजे. कारण, ब्राह्मणादिकांनाही ब्रह्मच म्हणतात. या करिता तो कृपा करून सांगावा. ॥७॥

दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते ।
ब्रह्मशब्देन तद्ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ॥८॥

अर्थ :
इति महावाक्यविवेकोनाम पञ्चमः परिच्छेदः ॥५॥

अर्थ :
गुरु - तू म्हणतोस ते खरे आहे. या वाक्यांतील ब्रह्म शब्दाचा अर्थ असा आहे की, जितके म्हणून दृश्य पदार्थ आहेत त्या सर्वांचे जे अधिष्ठान तत्त्व तेंच येथे ब्रह्म असे समजावें. हे ब्रह्म सच्चिदानंदरूप आहे. ते व वर सांगितलेला आत्मा ही दोन्ही एकच आहेत. असे या महावाक्याचे तात्पर्य ॥८॥

अर्थ :

इति महावाक्यविवेकः समाप्तः ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग