एक आपण साधू झाले । य
6.
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचे गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हा । विश्व ब्रह्म होइल तेव्हा ॥३॥
ऐसा उमज आदिअंती । मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
