रावणे हे केले लग्नाम
6.
रावणे हे केले लग्नामाजी विघ्न । असे की स्मरण तुजलागी ॥१॥
आणि रे धनुष्य मारीन रावणा । लंका बिभीषण देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४॥
लंकेपुढे मोठे माजवीन रण । तोडीन बंधन सुरवराचे ॥५॥
विश्वामित्र याग नेईन मी सिद्धि । मारीन कुबुद्धि दोघा जणा ॥६॥
खर दुषणाचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७॥
ध्याती मज त्यासी बहुत आवडी । न विसम्बे घडी त्यासी एक ॥८॥
बोलीला वाल्मिक तैसेंचि करीन । वर्तोनि दावीन नामा म्हणे ॥९॥
