नावडे वैकुंठ शेषशयन
6.
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव सदन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवा घरी ॥२॥
जो नातुडे ध्यानी समाधिसाधनी । तो स्वानंदे कीर्तनी नाचतसे ॥३॥
जो यज्ञावदानी कांही नेघे माये । तो द्वादशी क्षीराब्धी उभउभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणे बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धी ॥५॥
वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी । एका जनार्दनी देव दास्यत्व करी ॥६॥
द्वादशी अभंग समाप्त
