बाळक्रीडा कृष्ण (चरि
5.
बाळक्रीडा कृष्ण (चरित्र)
बाळक्रीडा - अभंग ५ ते १२
असता बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणे दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥ मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळी अवतार । गौळीया घरी ॥३॥ वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करी । वाजवीत ॥४॥ जळी रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥ कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजेराज्यधर । उग्रसेना ॥६॥ एक यश द्यावे त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥ एका जनार्दनी । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥
