वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › ३. घोंगडी भारुड

(घोंगडीची रूपके)

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073494 · अभंग क्र. ५

5.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशी ते ही होते ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवो द्या ॥धृपद॥
व्हावे ऐसे निसंतान । घेईन आन तुजपाशी ॥२॥
तुका म्हणे लाहाण मोठा । सांडा ताठा हा देवा ॥३॥

अर्थ :
सर्वांच्या घोंगडया पंचमहाभूतापासून तयार झालेल्या असतात व माझीही पंचमहाभूतापासूनच तयार झालेलो आहे. सर्व काही माझे आणि मी असा मिथ्याभिमान मी धरत आहे परंतू यामधून मी बाहेर कसे पडावे हे तुम्हीच मला सांगावे. अशा प्रकारे निसंतान व्हावे म्हणजे जन्ममरण रहित व्हावे अशीच आण मी देवा तुझ्यापाशी घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हा लहान हा मोठा अशा खोटा अभिमान तुम्ही माझ्यापासून दूर टाकून दयावा त्यालाच सोडवावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग