वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › ३. घोंगडी भारुड

(घोंगडीची रूपके)

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073498 · अभंग क्र. ६

6.
(घोंगडीची रूपके)
नाही तुझे उगा पडत गळा । पुढे गोपाळा जाऊ नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरी । बोलण्या उरी नाही ऐसी ॥धृपद॥
तुम्हा आम्हा पडदा होता । सरला आता सरोबरी ॥२॥
तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥

अर्थ :
हे गोपाळा मी आता माझा देहाभिमान टाकून दिला आहे त्यामुळे विनाकारण तुझ्या गळयाला मी पडणार नाही तुझ्या गळयाला उगाच मी पडत नाही त्यामुळे तू माझा स्वीकार केल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. देवा तू जर माझा अंगीकार केला नाहीस तर मी तुझ्या चाहाडया संतांच्या घरी जाऊन सांगेन मग तुला बोलण्यासाठी काहीही मागे उरु देणार नाही. देवा तुमच्या व माझ्यामध्ये जो व्दैताचा पडदा होता तो आता बाजूला सरला आहे आता तुमच्यात व माझ्यात ऐक्य झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यात व माझ्यात आता केवळ बोलण्यापुरता भेद उरला आहे व आपल्यात जी मिठी पडली आहे ती आता सुटणे शक्य नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग