मनुष्य करिसी तरी भक्
6.
मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥१॥
श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥२॥
पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥३॥
झाड करिसी तरी तुळसोचेनि मिषे । तुझे द्वरी वसे ऐसे करी ॥४॥
वृक्ष करिसी तरी मंडप मेखचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥५॥
पाषाण करिसी तरी रंग शिलेचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥६॥
उदक करिसी तरी सडियाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥७॥
नामा म्हणे विठो कीर्तनाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥८॥
