आषाढी कार्तिकी विसरू
5.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥१॥
पतितपावन मी तो आहे खरा । तुमचेनि बरा दिसतसे ॥२॥
तुम्ही जाता गांवा हुरहुर माझे जीवा । भेटाल केधवा मजलागी ॥३॥
धांवोनिया देव गळा घाली मिठी । स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ॥४॥
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी । म्हणे चक्रपाणि नामयासी ॥५॥
