मी तो अल्पमती हीन ।
5.
मी तो अल्पमती हीन । काय वर्णु तुमचे गुण ।
उदकी तारिले पाषाण । हे महिमान नामांचे ॥१॥
नाम चांगले माझे कंठी राहो भले ।
कपिकुळ उध्दरिले । मुक्त केले राक्षसा ॥२॥
द्रोणागिरी कपीहाती । आणविला सीतापती ।
थोर केली ख्याती । भरतभेटी समयी ॥३॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखणिली ।
लंका दहन केली । हनुमंते काशाने ॥४॥
राम जानकी जीवन । योगियांचे निजध्यान ।
राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥
