बालक्रीडा.
5.
बालक्रीडा.
स्तुती.
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधे शोभताती हाती । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्यरूप तुझे उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥
तुझे नाम घेता दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामे ॥४॥
चौदा विद्या तुझे कृपेने येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रूणझुण पायी वाजताती वाळे । ऐकोनी भुलले मन माझे ॥६॥
भक्तवत्सला एके पार्वतीनंदना । नमन चरणा करितसे ॥७॥
नामा ह्मणे आता देई मज स्फूर्ती । वर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥
