ऐकोनिया मात चोखा सां
6.
ऐकोनिया मात चोखा सांगे तिसी । पूर्ण नव मासांसी भरियेले ॥१॥
साहित्य सामुग्री नाही कांही घरी । म्हणोनी निर्धारी बोलियेली ॥२॥
ऐसा हा घोर कोणे वागवावा । म्हणोनी तुझे गांवा वेगे आलो ॥३॥
निर्मळा म्हणे अनुचित केले । तुम्हा काय वहिले म्हणो आता ॥४॥
