सुदिन सुवेळ तुझा मां
5.
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।
पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असे वो ।
नवस पुरवी माझ्या मनींची जाणोनिया इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥
बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे वो ।
उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे वो ॥४॥
स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती वो ।
ओवाळली माता विठोबाई पंचभूती वो ॥५॥
तुझे तुज पावले आता नवस पुरवी माझा वो ।
तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥
