वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 3. नृसिंह जन्माचे अभंग

मानव शरीर सिंह वदन ह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073325 · अभंग क्र. ६

6.
मानव शरीर सिंह वदन हरि । गुरगुर तो करी देवराव ॥१॥
अवतार वेळा वैशाख मासी । चतुर्दश संधीसी अर्ध बिंबी ॥२॥
घरी ना मंदिरी सभे ना बाहेरी । उंबरीयावरी मारियेला ॥३॥
शस्त्राने न मरे ऐसा वर होता । म्हणोनि नखे त्याचा अंत केला ॥४॥
वर राखोनिया वध केला पाही । दासाची नवाई वाढवित ॥५॥
राज्यी बैसविला प्रल्हाद निजभक्त । केली जगी ख्यात नामा म्हणे ॥६॥

नृसिंह जन्माचे अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग