वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 3. मंगळवार चे अभंग

माझे कुळीची कुळस्वाम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073620 · अभंग क्र. ६

6.
माझे कुळीची कुळस्वामिनी ।
विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासिनि ।
ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥१॥
येई पुंडलिक वरदायिनी ।
विश्वजननी रंगा येई वो ॥धृ॥
मध्ये सिंहासन घातले ।
प्रमाण चौक हे साधिले ।
ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले ।
धूप दाविले । सुवासे करूनि ॥२॥
सभामंडप शोभला । भक्ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला । रंग माजला ।
वेद बोलिला । मूळची ध्वनि ॥३॥
शुक सनकादिक गोंधळी ।
जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी मातले बळी ।
प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥
ऐसा गोंधळ घातिला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऐक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग