उपाधीच्या भेणे आलोंस
6.
उपाधीच्या भेणे आलोंसे शरण । काया वाचा मने सहित देवा ॥१॥
तू माझा मायबाप सकळ वित्त गोत । तू माझे गणगोत पंढरिराया ॥२॥
तू माझी साउली तू माझी गाउली । प्रेमाची माउली तूंचि माझी ॥३॥
बा म्हणे तुज विकिला जीव प्राण । काया वाचा मन सत्य देवा ॥४॥
