वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

कैलासीचा देव भोळा चक

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073662 · अभंग क्र. ६

6.
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पती योगीराज ॥१॥
तयाचिये पायी माझे दंडवत । घडो आणि चित्त जडो नामी ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी । तिजा नेत्रज्वाळी जातवेद ॥३॥
कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती । सर्वांगी विभूती शोभतसे ॥४॥
गळा रुंडमाळा खापर हस्तकी । रामनाम मुखी सर्वकाळ ॥५॥
गजचर्मधारी स्मशानी राहिला । संगे भूतमेळा विराजित ॥६॥
नामा म्हणे नामे नासोनिया पाप । करी सुखरूप भक्तालागी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग