त्रिभुवनीचे सुख पहाव
6.
त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी । दिनरात्री धणी न पुरे माझी ॥१॥
विटेवरी सांवळा पहाता पै डोळा । मन वेळोवेळा आठवितु ॥२॥
सागरी भरीते दाटे तैसे मन उल्हाटे । वाट पाहो कोठे तुझी रया ॥३॥
बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसे झाले ॥४॥
