गाऊ नाचू विठो तुझा क
6.
गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद ।
जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा झाला माझे मनी ।
देखिली लोचनी विटेसहित पाउले ॥२॥
न करी तपसाधन मुक्तीचे सायास ।
हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥३॥
तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काई ।
पंढरीचा राणा सांठविला हृदयी ॥४॥
