मुढा तोचि मुंडा अवघा
604.
मुढा तोचि मुंडा अवघा लुंडा करी इंद्रियांचा ।
मन जिंकोन करील त्याग अवघा वासनेचा ॥१॥
तरीच बरोबरी होईल समसरी ।
नाही तरी जाय अधोमुख करी ॥२॥
मनपणी मना कोठे घेऊनिया वाव ।
पूर्णपणी पाही अवघा आत्मदेव ॥३॥
सुखस्थिती अनुभव विज्ञानेसी लाहे ।
बहिणी तोचि मुंढा अंतर्बाह्य पाहे ॥४॥
