वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

तुडतालेवांचूनी अवस्थ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074383 · अभंग क्र. ६०६

606.
तुडतालेवांचूनी अवस्था काईंसी ।
दुजे तरी बोलो कवणासी गे माये ॥१॥
अनुमानालागी नुरिजे उरी ।
सांगता लोकाचारी लाजिजे ॥२॥
अबोलणेसी बोलणे विनोदे ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला गुणनिधि ॥३॥

अर्थ :
तुडतालेवांचूनी म्हणजे प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय परमात्मप्राप्ती कशी होणार तसेच परमात्मज्ञानाविषयी अनधिकारी मनुष्याजवळ बोलून उपयोग तरी काय? अनुमानाने त्या परमात्म्याची गोष्ट चार लोकांतही सांगण्या जोगे नाही. कारण सर्व सामान्य लोक त्याचे आधिकारी नाही. म्हणुन त्यांच्याजवळ परमात्म्याविषयी काही बोलायचे तर लाज वाटते. बोलायचे झाले तर माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याशीच बोलावे हेच बरे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग