वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

सदा सोमवारीं| विभूति

🙏 4. संत नामदेव · ABH-083613 · अभंग क्र. ६१२

612.
सदा सोमवारीं| विभूति लावूनि शिरी| तुमच्या मंदिरी| आलाप करी ॥१॥
शंकर त्रिपुरारी| हरि नाम उच्चारी| म्हणती षडाक्षरी| पावे मज ॥२॥
ॐ नमः शिवाय| हरहर जयजय| नाही भवभय| तुझेनि नामे |॥३॥
करिती शिवरात्री| वाहाती बेलपत्री| प्रगट होऊनि गाती| भक्तिभावे |॥४॥
बोलती सत्कीर्ति| जिंतिले पवित्री| हरहर नाम मंत्रीं| तुज पूजिती ॥५॥
रुद्राक्षाच्या माळा| घालूनिया गळा| तो तुम्हा जवळा| सर्व मान्य ॥६॥
शिवशंभु भोळा| बहुता पुण्य जोडला| पावे जाश्वनीळा| म्हणे नामा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग