वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

आधींच कृपाळू भोळा मह

🙏 4. संत नामदेव · ABH-083653 · अभंग क्र. ६०४

604.
आधींच कृपाळू भोळा महादेव| जाणितला भाव कुरंगीचा ॥१॥
कृपा केली देवे मांडिला सन्मान| धाडिले विमान दूता हाती |॥२॥
लखलखित टके पताका डोलती| तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥
नाना सुमनांची शय्या आरुवार| करिती उपचार सिद्धि आठ ॥४॥
आले अकस्मात तयाचियेपाशी| पाहता सर्वांसी नवल वाटे ॥५॥
दिव्य देह जाले पाचांचे ते काळीं| विमानी बैसली लागवेगे ॥६॥
पारधी देखोनी तटस्थ राहिला| दूती तया केला उपदेश |॥७॥
शिवरात्री आजी जागरण उपवास| केला तेणे दोष सर्व गेला ॥८॥
करोनी पारणे होई शिवभक्त| आशापाशी चित्त गोवु नको ॥९॥
अखंड कीर्तन शिवनामाचे करी| तेणे मोक्षपुरी पावशील ॥१०॥
पुढिल्या शिवरात्री नेऊ कैलासासी| सांगोनिया त्यासी गेले वेगी ॥११॥
नामा म्हणे मोक्ष जाला त्या पांचाशी| वस्ती चंद्रापाशी केली त्यांनी ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग