वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अरे गलबला करू नका ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076233 · अभंग क्र. ६०८

608.
अरे गलबला करू नका ।
माजे उगेचि ऐका ।
तुम्ही आम्ही जाऊ लोका ।
देवाचिया ॥१॥
तुम्ही भावे जरी ऐकाना ।
तरी मी पद गायीना ।
मज पडे हे मौना ।
कथेमध्ये ॥२॥
तुम्ही श्रोते सावधान ।
ऐका बोबडे भाषण ।
तुम्ही कृपा जी करून ।
परिसावे ॥३॥
मी तरी शिवरीची गाण ।
तुम्ही येथीलचि जाण ।
तुम्हा आम्हा आजि लगन ।
लागले असे ॥४॥
जैसा पडिला कपाळी ।
तोचि पूजावा त्रिकाळी ।
म्हणवुनी तुम्हाजवळी ।
मागतसे ॥५॥
जरी ऐकाल सदरे ।
तरी स्मरती उत्तरे ।
नाही तरी व्यर्थ का रे ।
पीडा आम्हा ॥६॥
मन तुमचे गुडगुडी ।
येथे हरिदास बडबडी ।
तरी झाली घरबुडी ।
श्रोत्यावक्त्या ॥७॥
तुम्ही घेत असा विडे ।
माझे मागे कुणीकडे ।
जैसे प्रेतापुढे रडे ।
तैशापरी ॥८॥
मन तुमचे दोघरी ।
क्रीडतसे बाजेवरी ।
गळासीये धरी ।
देह येथे ॥९॥
तुम्हा चढलासे उबागी ।
हरिदास गाय रंगी ।
दोघा नागवण वेगी ।
घरा आली ॥१०॥
यांचे चित्त मोच्यापाशी ।
कथा नयेचि मनासी ।
तरी कासया कथेसी ।
अडचणी ॥११॥
ऐसे उदंड बोलता ।
व्यर्थ चावटी सर्वथा ।
अवघे ऐका जी कथा ।
मनोभावे ॥१२॥
असो सिद्ध महामुनी ।
संन्यासीही असो कोणी ।
ऐका सादरे श्रवणी ।
हरिकथा ॥१३॥
जपी तपी असो सोमपी ।
असो अश्वमिनी पापी ।
परी देवाचे स्वरूपी ।
चित्त दीजे ॥१४॥
असो पंडित वेदांती ।
मीमांसादि हे व्युत्पत्ती ।
परी कथा अतिप्रीती ।
ऐकावी ॥१५॥
असो सिद्ध वा साधक ।
असो राजा अथवा रंक ।
कथा आधी आवश्यक ।
परिसावी ॥१६॥
असो ब्रह्मज्ञानी थोर ।
अतिव्युत्पत्ति चतुर ।
परि कथेसि तत्पर ।
चित्त दीजे ॥१७॥
ऐसी नामे मज घेता ।
फार वाढेल पै कथा ।
पुढे हरिकीर्तिकथा ।
आहे गावी ॥१८॥
हेचि सकला प्रार्थना ।
करितसे भावे जाणा ।
कथा ऐकोनिया मना ।
विवंचिजे ॥१९॥
जरी इतुके न ऐका ।
तरि घरासी जाना का ? ।
नाही वाटे काही धोका ।
अंधारीचा ॥२०॥
बहिणी म्हणे स्वानुभव ।
ऐका धरूनिया भाव ।
तेणे भावे तुम्हा देव ।
जवळी होय ॥२१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग