वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

मी तू प्रवृत्तीसी आल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074376 · अभंग क्र. ६१३

613.
मी तू प्रवृत्तीसी आले ।
समग्र गिळिले वासनेसी ॥१॥
नाही त्यास मेरु कैंचा विवेकु ।
जनवन लोकु ब्रह्म दिसे ॥२॥
उजेडली शांति मावळली निशी ।
अवघा ब्रह्मरसी पाजळले ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती क्षमाचि उपजली ।
प्रवृत्ति सामावली निवृत्ति रया ॥४॥

अर्थ :
श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने ब्रह्मात्म बोध उजाळला. म्हणून त्या बोधाने मी तु हे द्वैत व त्या द्वैताच्या आश्रयावर असणाऱ्या वासना या सर्वांचा नाश होऊन गेला. तो बोध सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे त्याच्यापुढे जन, वन, पर्वत इत्यादिकांचा विचारही शिल्लक राहात नाही. सर्वत्र ब्रह्मरुपच दिसते. अज्ञान नष्ट होऊन, शांती उदयाला आल्यामुळे सर्व संसार ब्रह्मरसाने प्रकाशित झाला. माझ्या चित्तांत क्षमा उदय पावून त्यात सर्व प्रवृत्ति मावळून गेली. ही सर्व श्री गुरु निवृत्तिरायांची कृपा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग