वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संचिते आणिले भागा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076420 · अभंग क्र. ६१०

610.
संचिते आणिले भागा ।
यासी काय करू सांगा ।
आत्मा आत्मी नुरोनि जागा ।
ब्रह्मचि जाले ॥१॥
यासी यासी काय करणे ।
शिकविता न घे मने ।
देखोनी अखंड चिद्घने ।
स्वरूप डोळा ॥२॥
तेथे न देखे जातीकुळ ।
वर्णावर्ण भ्रमजाळ ।
स्वरूपी राहिले अढळ ।
मन हे माझे ॥३॥
आता हे न चले काही ।
उपाव सांगता देही ।
उपदेश महावाक्य पाही ।
सर्वत्र जाले ॥४॥
बहिणीसी भेटला तुका ।
महावाक्य जाहले फुका ।
ऐकती घोकती ते परलोका ।
धावत जाती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग