सांडावे ते काय आता स
611.
सांडावे ते काय आता सर्वही सवेचि आहे ।
जावे आता कोठे सारे मायावेष्टित दिसे ।
वैराग्य घेउनी त्यजू भवासी ते तव पुढेचि भासे ।
यासी यासी काय करणे मन स्थिर नसे ॥१॥
ठायीच्या ठायी बरे रे असे मोकळ्या वृत्ति ।
विटंबूनी कायास्थिति आता हिंडावे किती ।
घरीच्या गह्रा बरवा पाहे विवेकबुद्धि ।
येणेच जोडेल तुज आत्माराम त्रिशुद्धी ॥२॥
घर जरी त्यजू पाहसी तरी तुझे शरीर सवे ।
भोजनी क्रूरता धरिसी तरी कल्पना सवे ।
कन्यापुत्र त्यजिसी जरी तरी इंद्रिये सवे ।
शरीरसंबंध तुझा ज्ञाने करू तुटे स्वभावे ॥३॥
सांडावे जे आता काय नव्हे वासना त्याग ।
सांगावे ते सर्व दिसे जिव्हा उपस्थ सांग ।
जयासाठी केला विटंबू ते तव न संडी पाठी ।
बहिणी म्हणे मिथ्या सोंग तुमच्या फोल या गोष्टी ॥४॥
