वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अधिक देखणे तरी निरंज

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074320 · अभंग क्र. ६१५

615.
अधिक देखणे तरी निरंजन पहाणे ।
योगीराज विनविणे मना आले वो माये ॥१॥
देहवळी देउनी साधिले म्या साधनी ।
याने समाधान मज जोडले वो माये ॥२॥
अनंगपण फिटले मायाछंदा साठवले ।
सकळ देखिले आत्मस्वरुप वो माय ॥३॥
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्या देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आता प्रपंचा पहाणे ।
निजानंदी राहाणे स्वरूपी वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठली निर्धारू म्या देखिला वो माये ॥६॥

अर्थ :
व्यवहारोपयोगी ज्ञान कमी अधिक प्रमाणाने सर्व जीवांना आहेच पण त्या सर्वा पेक्षा अधिक महत्वाचे ज्ञान असेल तर ते निरंजन म्हणजे परमात्म्याचे ज्ञान होय. नामाकरिता योगीराज जे श्रीगुरू त्याची विनवणी म्हणजे सेवा करून देह त्यांना देऊन ते ज्ञान मी प्राप्त करून घेतले. आणि मला समाधान झाले. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देहतादात्म्यबुद्धि नाहीशी होऊन परिपर्ण आत्मस्वरूप ज्ञान झाले. पिंपळाला सुवास नाही. पण तो चंदनाच्या वासाने भरुन जावा त्याप्रमाणे त्या आकारवान जगतात. मी निराकार परमात्मा पाहिला. यानंतर प्रापंचिक ज्ञान पाहाणे पुरे स्वकीय आत्मानंदात राहाणे बरे. रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचा समुद्रच आहेत. असा निश्चय करून मी त्यांना पाहिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग