आदि पुरुष सबरा भरीत
611.
आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये ॥१॥
आतळ वितळ सुतळ रसातळ । सप्ताहि पाताळें भरुनि उरला ॥२॥
वैंकुंठ कैलास चतुर्दश लोक । भरलासे व्यापक दशदिशां ॥३॥
एका जनार्दनी स्थावर जंगमीं । भरलाअसे व्योमी आदि अंती ॥४॥