वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

श्रोत्याविण जे गायन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075892 · अभंग क्र. ६०७

607.
श्रोत्याविण जे गायन ।
गात्याविण श्रोता जाण ।
त्याची सांगेन ते खूण ।
आइकावी ॥१॥
अन्न सुरस निपजले ।
नेउनी रोग्या वोगरिले ।
तैसे व्यर्थ गाणे केले ।
श्रोत्याविणे ॥२॥
गाणे होतसे सुस्वर ।
श्रुती लावून मधुर ।
राजा श्रवणी बधिर ।
तरी ते व्यर्थ ॥३॥
अति सुंदर पद्मिनी ।
रंभा मृगनयनी ।
पती नपुंसक गौणी ।
तरी ते व्यर्थ ॥४॥
अश्व सुंदर नाचत ।
नाना कलाही दावित ।
बैसणार नाही तेथ ।
तरी ते व्यर्थ ॥५॥
देह सुंदर चांगले ।
परी प्राणची ओसरले ।
जीव स्वर्गग्रामी गेले ।
तरी ते व्यर्थ ॥६॥
विप्र सुंदर नेटका ।
परी कोड मुखी देखा ।
तरी तो जाणावा आवांका ।
सर्व व्यर्थ ॥७॥
कर्म करी द्विज सांग ।
परी गायत्रीचे नेणे अंग ।
तरी ते सर्व सांगोपांग ।
अवघेचि व्यर्थ ॥८॥
भागीरथी गंगाजळ ।
उत्तम हे सुशीतळ ।
परी ते अमंगळ स्थळ ।
तरी ते व्यर्थ ॥९॥
तैसे श्रोतेविण गाणे ।
ते तव लाजिरवाणे ।
म्हणून सावध ऐकणे ।
हरिकथा ॥१०॥
तुम्ही श्रोते आम्हा कैसे ।
राया परीक्षिती ऐसे ।
बहिणी म्हणे त्या मानेसे ।
नाम गावे ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग