वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

विश्वास अंतरीचा जाणो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088891 · अभंग क्र. ६०१

601.
विश्वास अंतरीचा जाणोनी ।
नाम ठेवा माझया वदनी ।
रुप मनाचे आसनी ।
कृपा करुनी बैसवा ॥१॥
रुप मनाचे आसनी ।
कृपा करुनी बैसवा ॥१॥
करीन तैसी घ्यावी सेवा ।
विश्वास पालटों न दयावा ॥
आईका विनविले ते देवा ।
अहो पंढरीनिवासा ॥२॥
माझिये बुध्दीसी धैर्य दयावे ।
सेवेसी इंद्रिया राबवावे ॥
आपुलिये कीर्तनी राखावे ।
प्रेम माझे सर्वदा ॥३॥
गर्व अभिमान दवडावा ।
आळस निद्रा परती ठेवा ।
विसर तुमचा न पडे देवा ।
देई सेवा हे दान ॥४॥
निळा म्हणे कृपासिंधु ।
तुम्ही साचार दीनबंधु ।
आहा म्हणोनि घेतला छंदु ।
येवढे आर्त पुरवावे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग