वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

दुरी ना जवळी त्रिभुव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074342 · अभंग क्र. ६१४

614.
दुरी ना जवळी त्रिभुवन मंडळी ।
ते मनाचा मुळी बैसलेसे ॥१॥
पाहता न दिसे भानुप्रकाशे ।
येहवी ते असे मशकी रया ॥२॥
बोलो जाता जेणे जिव्हाचि खादली ।
पाहाता पाहाता नेली चर्मदष्टी ॥३॥
दांतेवीण जेणे स्थूलदेह खादले ।
शस्त्रेंविण छेदिले लिंगदेह ॥४॥
त्वंपदी सिद्ध निवृत्ति लाधले ।
गुरुलक्षी हरपले द्वैतभान ॥५॥
निवृत्तिदासा तुम्ही बहुत न बोला ।
रखुमादेविवरा ध्याइजेसु उगला ॥६॥

अर्थ :
जे त्रैलोक्य मंडळामध्ये व्यापक असून ज्याला जवळ किंवा दूर असे म्हणता येत नाही. ते ब्रह्म मनाचे अधिष्ठान आहे. त्यालाच आत्मा, साक्षी, कूटस्थ अशी नावे आहेत. ते आत्मस्वरुप सूर्याच्या प्रकाशाने दिसत नाही असे असले तरी सर्व कृमि किटकातही ते भरलेले आहे. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन केले तर वाणीच बंद पडते. चर्मचक्षूने पाहू गेले तर दिसत नाही. दांता वाचुन ज्याने स्थूलदेह खाल्ला शस्त्रावांचून लिंग देहाचा छेद केला. असे जे सर्व धर्मरहित सिद्ध त्वंपद ते गुरुंनी लक्षणेने दाखविलेल्या तत्पदलक्षाच्या ठिकाणी लय पावते, असे माझे जे श्रीगुरु निवृत्तिनाथ त्यांनी मला जीव ब्रह्मैक्यज्ञानाने कृतार्थ केले ज्ञानेश्वर महाराज आपले मनाशी म्हणतात. हे निवृत्तिदासा तुम्ही बहुत बोलू नका. मुकाट्याने रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांचे ध्यान करा. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग