वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

हेचि चिंता दिवस राती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088882 · अभंग क्र. ६११

611.
हेचि चिंता दिवस राती ।
राहिली चिती न ढळे ते ॥१॥
कराल माझा अंगीकार ।
किंवा दूर भोवंडाल ॥२॥
बहुत जन्म घेता कष्टी ।
झालो हिंपुटी दु:ख शोके ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
राख अनंता चरणापे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग