सर्वगुणी गुणमंडिता ।
605.
सर्वगुणी गुणमंडिता ।
सर्वरुपी रुपशोभिता ।
सर्वी सर्व तू अनंता ।
यश वागविता निज कीर्ति ॥१॥
ऐसी असोनिया शक्ति ।
दवडता का माझी आती ।
चरण पहावया चित्ती ।
वर्ते चिंता अनिवार ॥२॥
काय नाही तुमच्या हाती ।
सकळ ब्रम्हांडाच्या व्यक्ती ।
घडामोडा निमिषाप्रती ।
धरा आवडती रुपे तैसी ॥३॥
मासा कांसव डुकर होणे ।
नृसिंह वामन रुप ठेगणे ।
ब्रम्हचर्य आणि फरश धरणे ।
वंशनिपातने क्षत्रियांचा ॥४॥
परमात्मा आणि राज्य करी ।
एकपत्नीव्रत शिळा तारी ।
सत्यवचनी एक बाणधरी ।
रावणारी मदनमूर्ति ॥५॥
नंदानंदन गुणातीत ।
लीलाविग्रही ऐश्वर्यनाथ ।
कामिनी भोगुनी कामातीत ।
उच्छिष्टे स्वीकारीत गौळियांची ॥६॥
बौध्य कलंकिया =ह्यग्रीवा ।
नामे रुपे नटलेति देवा ।
निळा म्हणे माझिया भावा ।
रुप भेटवा चतुर्भुज ॥७॥
