वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

मन सुमन घालूनि माळा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074340 · अभंग क्र. ६०७

607.
मन सुमन घालूनि माळा ।
करुनि सकळा गळा वो माये ॥१॥
आउट पिठींची दुरुगुळी घातली ।
तेथे दोघे पुंजे बैसविली वो माये ॥२॥
तेथे अद्वैत रुप परोपरी वासु ।
करोनिया सायासु वैराग्यज्ञाने वो माये ॥३॥
ऐसा हृदयमंदिरी दुर्गादेवी अंतरी ।
रखुमादेविवरु निर्धारी वो माये ॥४॥

अर्थ :
चांगले मन हेच कोणी फुले त्या फुलांची गळ्यांत पुरेल अशी सुंदर माळ करुन घातली म्हणजे सर्व प्रकाराने मन स्वाधीन करुन ठेवले. नंतर साडेतिन मात्रेच्या ॐ काराचे अधिष्ठान जे परमात्मस्वरुप त्याला जेव्हा नमस्कार केला त्यावेळी दुर्गुळी म्हणजे धूरी घातली तेव्हा बोध व भक्ति जवळ होती. जण ती दोघे परमात्म्याची पूजाच करीत होती. तेथे अनेक प्रकारचे सुवास ज्यांत आहेत. असा अद्वैताचा अंगारा लावला. पण ही वैराग्याची व ज्ञान प्राप्तीची स्थिती प्राप्त करावयास फार सायास करावे लागले. मी अंतर्मुख दृष्टि करुन जेव्हा पाहू लागतो. तेव्हा माझ्या हृदयांत रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हीच कोणी दुर्गादेवी माझ्या हृदयांत प्रगट झाली आहे. असे मला दिसते. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग